गंगापूर, (प्रतिनिधी) राजकीय चित्र या निकालानंतर गंगापूर तालुक्यात शिवसेना भाजप युतीचे वर्चस्व प्रस्थापित झाले असून मिनी मंत्रालय म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गंगापूर तालुक्यात सत्ताधाऱ्यांपुढे आता विकासकामांना गती देण्याचे मोठे आव्हान आहे. पाणीपुरवठा, रस्ते, आरोग्य, शिक्षण, ग्रामीण विकास व मूलभूत सुविधा या मुद्द्यांवर जनतेच्या अपेक्षा वाढल्या आहेत.
आमदार प्रशांत बंब यांनी जिल्हा परिषद व पंचायत समितीचे निवडणूकीमध्ये चांगले परिश्रम घेतले. आणि त्यांना यश मिळाले आहे. जिल्हा परिषद आणि पंचायत समितीवर आमदार प्रशांत बंब यांच्या वर्चस्व दिसून येत आहे. जिल्हा परिषद आणि गंगापूर पंचायत समितीच्या निवडणुकीत जनतेने दिलेला कौल हा कामावरचा विश्वास आहे.
या निवडणुकीसाठी आम्ही सर्व कार्यकर्ते, पदाधिकारी आणि सहकाऱ्यांनी संघटनात्मक पातळीवर खूप परिश्रम घेतले. त्या मेहनतीला आज यश मिळालं आहे, याचं मला समाधान आहे. हा विजय कोणाचा वैयक्तिक नसून संपूर्ण कार्यकर्त्यांचा आहे. ज्या मतदारांनी आम्हाला पाठिंबा दिला, विरोधी उमेदवार आणि त्यांच्या कार्यकत्यांचेही मी अभिनंदन करतो, येणाऱ्या काळात जिल्ह्याच्या विकासासाठी सर्वांना सोबत घेऊन काम करण्याचा आमचा प्रयत्न राहील.
- आमदार प्रशांत बंब, आमदार
संगापुर पंचायत समिती निकाल
(गणनिहाय प्रमुख विजयी उमेदवार)
गण माळीवाडगांव कविता रविंद्र चव्हाण (भाजप) ७,२७२ विजयी
पाखरे सुनील सर्जेराव (भाजप) ५.३९८ विजयी
थोरात साबळीराम भानुदास (भाजप) ५,३३६ विजयी
प्रदीप भास्करराव सोनवणे (राष्ट्रवादी शरद पवार) ४.८६० विजयी
राजमगाव है.पु.
संजीवनी दिपक सदावर्ते (भाजप) ६,९४७ विजयी
संगिता गणेश ठोकळ (भाजप) ७,८७५ विजयी
आरगडे ज्योती संतोष (शिवसेना) ५,४५६ विजयी
मंगलाबाई ज्ञानेश्वर निळ (शिवसेना) ३,८७७ विजयी तुकांबाद
पिठले बाबासाहेब दत्तु (भाजप) ५.२८७ विजयी
मोहिणी जगदीश साळुंके (शिवसेना) ५,०८७ विजयी
शुभम नारायण बोहाडे
(राष्ट्रवादी अजित पवार) ४,०४७ विजयी
दादासाहेब कारभारी जगताप (राष्ट्रवादी शरद पवार) ५.९५८ विजयी
राजेश्वर कल्याण हिवाळे (शिवसेना) ३,४०७विजयी नेवरगाव कांता किशोर गायकवाड
(शिवसेना) ३,०४६ विजयी
मालती लक्ष्मण सांगळे (अपक्ष) ५,८७५ विजयी
बळीराम वसंत खताळ (अपक) ६,३९७ विजयी
मेनका कैलास म्हस्के (उबाठा) ३,७०१ विजयी शेंदुरवादा रावसाहेब मोहन टेके (उबाठा) ४,५२० विजयी.









